वहितली कविता मी माझ्या ब्लॉगवर ताकली,
सर्वांनी वाचावी म्हणुन पत्रिके सारखी वाटली!
माझी कविता वाचून त्यावर भरपूर रिप्लाय यावेत,
कवितेत कमी पण रिप्लाय मधे शब्द जास्त असावेत!
माझी कविता वाचून यावी ओठांवर गाणी
भाऊूक शब्दांनी यावे डोळ्यात पाणी!
अशी असावी माझी कविता जी सांगुन जाइल खूप काही,
प्रत्येक जण आपली कहाणी त्यात पाही!
मग,
माझी ही कविता त्याने तिला फॉरवर्ड करावी,
आवडते ती त्याला ह्याची ती पावती असावी !
Khupach chan lihile ahe kavita!!
ReplyDeleteTumhi 2010 madhe ekhi kavita lihile nahi...
Tumchya kavitechi mi fan ahe...Waiting for ur new kavita;-)