Saturday, March 26, 2011



खरच तुला माझी खूप आठवण येते का?
माझ्याशिवाय मन बैचेन होते का?

किती दिवस असा दूर राहणार माझ्यापासून
करमत नाही मला पण तुझ्यावाचुन...!

आता तुझ्या  येण्याची बघते आहे मी वाट
तू आल्यावरच करेन आता सगळा थाट...!

कविता लिहिताना तू मला आठवत असतो
कुपितल्या अत्तरसारखा सुगंध तुझा, ह्रुदयभर पसरत असतो!!!
--भाग्यश्री

विप्रो ते सिनेक्रोन

विप्रो पासून सिनेक्रोन नाही जास्त दूर
पुण्यातल्या हींजेवडीतच जुळले आम्हचे सूर...!

पब्लिक ट्रान्सपोर्ट मधे बसून, चालल्या आम्हच्या प्राइवेट गप्पा,
आम्हच्या एकत्र प्रवासाचा हाच पहिला टप्पा....!

आम्हचा स्टॉप आल्यावर कंडक्टर म्हणायचे...
गप्पा खूप ऐकल्या तुमच्या, आता तरी उतारा
तुम्हच्या लग्नाची पत्रिका मला नक्की पाठवा!

Friday, March 25, 2011

दिवस प्रेमाचा


आज आपला पहिला प्रेमाचा दिवस आहे खास, भेटायची तुला लागली आहे आस ...!
येतो आहे लवकरच भेटतो तुला 10 वाजता, CCD मधे बसून करू एकत्र नाश्ता...!

मागच्या वर्षी दिलेला गुलाब अठवून पहा, CCD मधे मिळतो का ग एक कटिंग चहा...?
म्हणे सीक्ड मधे कॉफी असते महाग फार,  पाहून आज तुला मे पडलो गप्प गार...!

आठव तो दिवस जेंहवा  आपण प्रेमात पडलो,मी तुझा की तू माझी असे म्हणत किती वेळ भंडलो....!