Thursday, September 25, 2008

कधी मेसेज तर कधी मेस्सेंजरवर बोलणे असते, जोक मारल्यावर खुदकन हसणे असते।

माझे मेसेज वाचुन तिने म्हणणे,
मला माझे हसु कंट्रोल होत नाही, तुला हे कसे सुचते मला कळत नाही!

मग मी तिला सांगण,
अग सुचत असे कधी तरी, प्रेमाची आहे हीच तर जादू खरी...!

मग तिला एखादी ओळ सुचावी, ती ओळ तिने मला मेसेज करावी

तिचा रिप्लाइ पाहून मी आनंदी व्हाव,
तिच्या मेसेज ला रिप्लाइ करून आपणही तिचे कौतुक कराव



असेच रिप्लाइ वर रिप्लाइ चालु असतात,महिन्याच्या बिलात भर घालत असतात...!

दिलाचा मामला आहे, कंजुशी करून कसे चालेल?
नुसते मेसेजने किती वेळ मन भरेल!!

1 comment:

  1. "नुसते मेसेजने किती वेळ मन भरेल!!"

    खरं आहे रे! मनातलं बोललास!!

    ReplyDelete